राघवेंद्र फर्टिलायझर्स प्रा. लि., कोल्हापूर
राघवेंद्र फर्टिलायझर्स प्रा. लि., कोल्हापूर ही कंपनी सन 2007 सालापासून फॉस्फोकंपोस्ट या फॉस्फेट खताचे उत्पादन करीत आहे.
अत्यंत सक्षम अशा “रिसर्च ॲन्ड डेव्हलपमेंट टीम”चे पाठबळ या कंपनीला लाभलेले आहे. आपल्या जमिनीच्या आणि पिकाच्या आवश्यकते नुसार अन्न पुरवठा करण्यासाठी ही कंपनी विविध खते विकसित करीत आली आहे. सर्वप्रथम “वृंदावन फॉस” हे एक परिपूर्ण फॉस्फेट खत याकंपनीने विकसित केले. त्यानंतर “वृंदावन पोटॅश”, “वृंदावन एन.पी.के. बूस्टर”, “वृंदावन भटटी स्पेशल”आणि “वृंदावन न्यूट्रि बूस्टर” ही सेंद्रिय खते विकसित करून आता रासायनिक खतांवरचे अवलंबन या कंपनीने पूर्णपणे नष्ट केलेले आहे.
“अधिक उत्पादन आणि खर्चात बचत” हे या खतांचे वैशिष्ट असल्यामुळे अल्पावधीतच ही खते महाराष्ट्रातील शेतक-यांच्या पसंतीस पडली आणि या खतांना मोठया प्रमाणात मागणी येण्यास सुरू झाले. शेतीचे उत्पादन व जमिनीची सुपिकता वाढवण्यासाठी राघवेंद्र फर्टिलायझर्स प्रा. लि. ही कंपनी मोठया प्रमाणावर काम करीत आहे.
त्यासाठी आवश्यक ज्ञान आणि प्रशिक्षण शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्याचे काम ही कंपनी करीत आहे. दिवसेनदिवस आपल्या जमिनीचा पोत आणि प्रत खराब होत चाललेली आहे. यामुळे उत्पादन कमी होत चालले आहे. पीक उत्पादनासाठी होणारा खर्च आणि मिळणारे उत्पादन याचा ताळमेळ बसत नाही. हा शेतकऱ्यांसाठी एक ज्वलंत प्रश्न झालेला आहे. जमिनीची सुपिकता आणि उत्पादनवाढ हे काम खुप मोठया प्रमाणावर करण्याचे ध्येय बाळगून ही कंपनी काम करीत आहे.
रासायनिक खतांची सेंद्रिय खतांसोबत भटटी लावून त्याचा वापर करणे ही संकल्पना या कंपनीने तळागाळा पर्यंत पोहोचविण्याचे सक्षमपणे ठरवले आहे. याचा फार मोठा फायदा शेतकऱ्यांना होण्यास सुरुवात देखील झाली आहे. ही खते वापरून आणि भटटी संकल्पनेचा वापर करून सर्व शेतकरी बांधवांनी किती फायदा होतो याचा प्रत्यक्ष अनुभव घ्यावा ही विनंती.
फोन -
“कृषीरत्न” पुरस्कार
आमची माती आमची माणसं व जयकिसान फार्मर्स फोरम तर्फे राघवेंद्र फर्टिलायझर्स प्रा .लि. या कंपनीला भारताचे पहिले कृषीमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जयंती निमित्त “कृषीरत्न” हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
रासायनिक खतांना विषमुक्त पर्याय देणे आणि जमिन वाचवा या अभियानासाठी भरीव कामगिरी करीत असल्या बददल हा कृषीरत्न पुरस्कार कंपनीला देण्यात आला.
दिनांक 27 डिसेंबर 2022 रोजी नाशिक येथे आयोजित केलेल्या पुरस्कार प्रदान सोहळयात कृषी विचारवंत व शेतकरी नेते मा. विजय जावंधिया आणि केंद्रिय आरोग्य राज्यमंत्री ड़ॉ भारतीताई पाटील यांच्या हस्ते हा कृषी रत्न पुरस्कार राघवेंद्र फर्टिलायझर्स प्रा. लि. कंपनीच्या सौ. गौरी पंडितराव आणि श्री. नरेन्द्र पंडितराव यांना प्रदान करण्यात आला. या पुरस्कार प्रदान सोहळयाला कृषी क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
आमची बांधिलकी केवळ खते विकण्यापुरती मर्यादित नाही. त्याही पुढे जाऊन आम्ही शेतकऱ्याना वेळोवेळी मार्गदर्शन करतो. कुठल्या वेळी कोणती गोष्ट किती प्रमाणात केल्यावर कृषी उत्पन्नामध्ये वाढ होते त्याची माहिती देतो. त्यासाठी आमच्याकडे अभ्यासू आणि तज्ञ मार्गदर्शक उपलब्ध आहेत.
शेतकऱ्याच्या समृद्धीमध्येच आमचे समाधान सामावले आहे. आज इतक्या वर्षांच्या वाटचालीत हजारो समृद्ध शेतकरी आमच्या सोबत जोडले गेले आहेत.
विविध कृषी उत्पादनांच्या वाढीमध्ये राघवेंद्र फर्टिलायझर्स प्रा. लि., कोल्हापूर ही कंपनी शक्य त्या सर्व मार्गानी कार्यरत आहे. वेळोवेळी शेतकऱ्याला येणाऱ्या अडी-अडचणी दूर करण्यासाठी कटिबद्ध देखील आहे.
ज्या उत्पादनांसाठी आपल्या कंपनीने अव्याहतपणे खत पुरवठा केला आहे त्यांची प्रातिनिधिक माहिती खाली दिलेली आहे.
▲
भरघोस केळी उत्पादन
▲
दर्जेदार द्राक्ष उत्पादन
▲
कांदा उत्पादन
▲
बहारदार फुलांचे उत्पादन
▲
शुभ्र कापसाचे उत्पादन
▲
बहुगुणी हळदीचे उत्पादन
▲
टपोऱ्या डाळिंबाचे उत्पादन
▲
रसरशीत टोमॅटोचे उत्पादन
आमच्या दर्जेदार आणि बहुउपयोगी खतांचा नियमित वापर करून लाभ घेत असलेल्या शेतकरी बांधवांच्या प्रतिक्रिया आवर्जून पहा.