उत्पादने - Raghavendra Fertilisers Pvt. Ltd., Kolhapur.

Go to content
राघवेंद्र फर्टिलायझर्स प्रा. लि., कोल्हापूर यांची दर्जेदार उत्पादने



वृंदावन फॉस




पिकाच्या वाढीमध्ये फॉस्फेटचे महत्व
पिकाच्या वाढीसाठी नत्र, स्फुरद आणि पालाश (NPK) हे तीन अन्नघटक अत्यंत महत्वाचे आहेत. यातील P म्हणजे फॉस्फेट हा पिकाच्या पोषणासाठी लागणारा महत्वाचा अन्नघटक आहे. पिकाची उत्पादन शक्ती / क्षमता ठरविणारा फॉस्फेट हा महत्वाचा घटक आहे ज्यामुळे मूळांची वाढ जोमदार होते. विशेषतः केशमूळांच्या वाढीसाठी फॉस्फेटची आवश्‍यकता असते.

वास्तविक भारतातील जमिनीत फॉस्फेटचे प्रमाण अगदी नगण्य आहे. वर्षानुवर्षाच्या सवयीने शेतकरी सिंगल सुपर फॉस्फेट आणि डी.ए.पी. या केमिकल खतांचा वापर करीत आले आहेत. परंतु केमिकल खतांच्या अतिरिक्त वापरामुळे होणाऱ्या फॉस्फेटच्या स्थिरीकरणासारख्या म्हणजेच पिकांना दिलेल्या फॉस्फेट खतांमधील फॉस्फेट पिकांसाठी उपलब्ध न होणे या गंभीर प्रश्‍नाकडे शेतकरी हवे तितके लक्ष देताना आढळत नाही. फॉस्फेटचे स्थिरीकरण आटोक्यात आणले नाही तर जमिनीचा पोत दिवसेंदिवस खालावत जाण्याची शक्यता आहे.
फॉस्फेट स्थिरीकरणाचे प्रमाण प्रामुख्याने खालील गोष्टींवर अवलंबून असते -
  • मातीमधील सेंद्रिय कर्ब आणि जमिनीतील सूक्ष्म जिवाणूंची संख्या.
  • क्षारांचे वाढते प्रमाण.
  • जमिनीचा सामू.

आपल्या जमिनीमध्ये फक्त 5 ते 25 टक्के फॉस्फेट उपल्ब्ध होतो, म्हणजे सुमारे 75 ते 95 टक्के स्थिरीकरण होते. उत्पादन कमी होण्याचे हे एक मुख्य कारण आहे. फॉस्फेटचे स्थिरीकरण आटोक्यात आणायचे असेल तर केमिकल खतांबरोबर सेंद्रिय खतांचा वापर करणे अनिवार्य आहे हे प्रयोगा अंती सिद्ध झाले आहे. केमिकल फॉस्फेट खतांबरोबर शेणखत अथवा इतर सेंद्रिय खताचा वापर केला तरच त्यातील फॉस्फेट पिकाला उपलब्ध होवू शकतो.

या पार्श्‍वभूमीवर वृंदावन फॉस हा रासायनिक फॉस्फेटला एक योग्य आणि किफायतशीर पर्याय होवू शकेल. शास्त्रोक्त पध्दतीने हे खत  वेगवेगळया प्रतीच्या जमिनीमध्ये व वेगवेगळया पिकांसाठी वापरून झाल्या नंतर आम्ही आज खात्रीशीर सांगू शकतो की वृंदावन फॉस हे परिपूर्ण भूसुधारक खत, रासायनिक फॉस्फेट खतांच्या स्थिरीकरणाच्या ज्वलंत प्रश्‍नाला देता येऊ शकेल असे उत्तर आहे.

वृंदावन फॉस हे खत भारतातील विविध मान्यवर कृषीतज्ञांच्या मार्गदर्शनाखाली उत्पादित केले जाते. या खतातील फॉस्फेट रासायनिक खतातील फॉस्फेट प्रमाणे स्थिर होत नाही आणि पिकाला आवश्‍यकतेनुसार उपलब्ध होतो. वृंदावन फॉस या खतात सुमारे 10 टक्के फॉस्फेट आहे जो पूर्णपणे पिकाला उपलब्ध होतो.

वृंदावन फॉस खताचे फायदे
  • फॉस्फेटचे स्थिरीकरण होत नाही.
  • फॉस्फेट उपलब्धतेसाठी शेणखत अथवा इतर सेंद्रियखते वापरण्याची गरज नाही.
  • पूर्वी वापरलेल्या रासायनिक खतांमधील स्थिरझालेला फॉस्फेट हळूहळू उपलब्ध होवू लागतो.

वृंदावन फॉस खत वापरण्याचे प्रमाण
  • डि.ए.पी.च्या 1 पोत्या ऐवजी 1.5 पोते वृंदावन फॉस अथवा 3 पोती सिंगल सुपर फॉस्फेट ऐवजी 1 पोते वृंदावन फॉस.
  • फॉस्फेटचा निम्मा डोस रासायनिक खतांव्दारा आणि निम्मा वृंदावन फॉस व्दारे दिल्यास रासयनिक खताच्या स्थिरीकरणाचे प्रमाण बरेच कमी होते.

वृंदावन पोटॅश (PDM)




पिकाच्या वाढीमध्ये पोटॅश अथवा पालाशचे महत्व
पिकाच्या वाढीसाठी नत्र, स्फुरद आणि पालाश (NPK) हे तीन अन्नघटक अत्यंत महत्वाचे आहेत. यातील K म्हणजे पोटॅश हा पिकाच्या पोषणासाठी लागणारा एक महत्वाचा अन्नघटक आहे. आपल्या जमिनीं मध्ये पोटॅशचे प्रमाण मोठया प्रमाणात आढळते. परंतु हा जमिनीत असणारा पोटॅश पिकाला उचलता येत नसल्यामुळे उपलब्ध होवू शकत नाही. म्हणून वरून पोटॅश खते देणे आवश्‍यक ठरते.

पिकाची गुणवत्ता ही पोटॅशच्या उपल्ब्धतेवर अवलंबून असते. फळाची गोडी, चव, रंग, चकाकी, जाडी टिकावूपणा यासारखे गुणधर्म हे प्रामुख्याने पोटॅशच्या उपलब्धतेवर अवलंबून असतात. त्याच बरोबर पिकाची रोगप्रतिकारक शक्ती ही पोटॅशच्या उपलब्धतेवर अवलंबून असते आणि पिकाला पाण्याची कमतरता झाल्यास पोटॅश हा घटक महत्वाचे कार्य करतो.

रासायनिक पोटॅश खते आणि पोटॅशची उपलब्धता
सर्वसाधारणपणे एम.ओ.पी. आणि एस.ओ.पी. ही रासायनिक खते पोटॅश या घटकासाठी वापरली जातात. एस.ओ.पी. हे खत खूप महाग असल्यामुळे एम.ओ.पी. याखताचा वापर सर्वात जास्त केला जातो.
एम.ओ.पी. मधील पोटॅश हा उपलब्ध होण्यासाठी किंवा त्याचे विघटन होण्यासाठी कमीत कमी 45 दिवसांचा कालावधी लागतो. एम.ओ.पी. हे खत पाण्यात लगेच विरघळते, त्यामुळे यातील पोटॅशचे पाण्यातून वाया जाण्याचे प्रमाण खुप आहे. याला “लिचिंग लॉसेस” असे संबोधण्यात येते. एम.ओ.पी. या खतातील सुद्धा अंदाजे 7 ते 20 टक्के एवढाच पोटॅश पिकाला उपलब्ध होवू शकतो.
एम.ओ.पी. या खतामध्ये पोटॅशचे बरोबरच जमिनीस अत्यंत हानीकारक असणारे क्लोराईड हा घटक पण आहे. आपल्या जमिनी खराब करण्यामध्ये या क्लोरार्इडचा फार मोठा सहभाग आहे.

वृंदावन पोटॅश खताचे फायदे
  • वृंदावन पोटॅश या खतामध्ये सुमारे 14.50 टक्के पालाश सेंद्रिय  उपलब्ध स्वरूपात आहे.
  • वृंदावन पोटॅश या खतामध्ये पोटॅशियम ह्युमेट हा एक महत्वाच घटक मोठया प्रमाणात उपलब्ध आहे.
  • वृंदावन पोटॅशमुळे जमिनीत असलेला पोटॅशपण उपल्ब्ध होण्यास मदत होते.
  • प्रयोगाअंती एक पोते एम.ओ.पी. ऐवजी एक पोते वृंदावन पोटॅशचा वापर अधिक पोटॅश उपलब्ध करून देतो हेे आम्ही सिद्ध केले आहे.
  • वृंदावन पोटॅश या खतातून पोटॅश तर उपलब्ध होतेच परंतु त्याबरोबर इतर अन्नघटक उचलण्यासाठी पिकाला मोठी मदत होते. यामुळे वृंदावन पोटॅश हे खत पिकासाठी आणि जमिनीसाठी एक प्रकारची संजीवनीच आहे.

वृंदावन एन. पी. के. बूस्टर



(शेणखताला उत्तम पर्याय)
पिकांच्या वाढीमध्ये सेंद्रिय खतांचे महत्व
कोणतेही खत दिल्या नंतर पिकाला मुळांव्दारे घेता येत नाही. त्यासाठी विविध प्रकारच्या ऑरगॅनिक ॲसिडमध्ये रूपांतर होणे आवश्‍यक असते, यालाच खतांचे विघटन असे म्हणतात. या खतांच्या विघटन होण्यासाठी आपल्या जमिनीत सूक्ष्मजीवाणूंची संख्या भरपूर असणे आवश्‍यक आहे. जमिनीतील सेंद्रिय कर्ब जर जास्त असेल तरच जमिनीत सूक्ष्मजीवाणूंची संख्या भरपूर असते. पण दुर्दवाने आपल्या जमिनीतील सेंद्रिय कर्ब आणि सूक्ष्म जीवाणूंची संख्या अतिशय कमी झालेली आहे. रासायनिक खतांची उपलब्धता ही आपल्या जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण व सूक्ष्म जिवाणूंची संख्या यावर अवलंबून आहे. यासाठी आपल्याला उत्तम प्रतिचे पूर्णपणे कुजलेले शेणखत दरवर्षी मोठया प्रमाणात वापरणे आवश्‍यक आहे. हे शक्य नसल्यास हिरवळीच्या खतांचा वापर नियमितपणे करणे आवश्‍यक आहे. परंतु या दोन्ही गोष्टी आपणाकडून नियमितपणे होवू शकत नाहीत. त्यामुळे आपल्या जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण दिवसेंदिवस घटत चालले आहे. याचा परिणाम म्हणजे आपण देत असलेल्या रासायनिक खतांची उचल फक्त 10 ते 25 टक्केच होते. बाकीची उपलब्ध न झालेली खते आपण ड्रिपरच्या खाली अथवा जेथे खते दिली तेथे उकरून पाहू शकता. जमिन जर क्षारपड अथवा चुनखडीची असेल तर रासायनिक खते उपलब्ध होण्याचे प्रमाण हे 5 टक्के पण नसते.

शेण आणि शेणखतातील फरक
आपल्याकडे शेणखत म्हणून गारीतील शेणखत अथवा विकत घेतले जाणारे वाळलेले शेण वापरण्याची पध्दत आहे. परंतु आपण वापरतो ते शेणखत नव्हे. त्या मध्ये सेंद्रिय कर्बाचे प्रमाण अतिशय कमी असते. शेणखत हे पूर्णपणे कुजलेले असणे गरजेचे आहे. परंतु असे पूर्णपणे कुजलेले शेणखत एक तर उपलब्ध होत नाही अथवा उपलब्ध झाले तरी खुप महाग पडते.

वृंदावन एन.पी.के. बूस्टर शेणखताला उत्कृष्ट पर्याय
राघवेंद्र फर्टिलायझर्स प्रा. लि. यांनी अतिशय उच्च दर्जाचे सेंद्रिय खत विकसित केलेले आहे. या खतामध्ये सेंद्रिय कर्ब मोठया प्रमाणात आहे. या शिवाय रासायनिक खतांच्या विघटनासाठी जे सूक्ष्म जीवाणू आवश्‍यक आहेत त्यांनी हे खत परिपूर्ण आहे. या शिवाय रासायनिक खतांच्या  उपलब्धतेसाठी आवश्‍यक असणारे पोटॅशियम ह्युमेट अथवा ह्युमिक ॲसिड सुध्दा यात मोठया प्रमाणात आहे. वृंदावन एन.पी.के. बूस्टर खत हे शेणखताप्रमाणे पसरून न वापरता सरीमधून देणे पण आवश्‍यक आहे. त्यामुळे जेथे पिकांची मूळे असतात तेथे सेंद्रिय कर्ब अथवा सूक्ष्म जीवाणूंची वाढ होते.
  • 10 टन शेणखता ऐवजी 1.5 टन वृंदावन एन.पी.के. बूस्टर खत
  • शेणखतापेक्षा स्वस्त आणि चांगला पर्याय

वृंदावन एन.पी.के. बूस्टरआणि रासायनिक खतांची भट्टी लावणे

भट्टी लावून खते देण्याचा फायदा
भट्टी लावण्यासाठी आपण वृंदावन एऩप़ीक़े बूस्टर खत वापरतो. त्यामध्ये मोठया प्रमाणात ह्युमस हा घटक असतो. 10 दिवस भट्टी लावल्यानंतर रासायनिक खतातील स्फुरद अथवा पोटॅश अथवा फेरस अथवा झिंक यांच्या कणांना या ह्युमसचे आवरण तयार होते म्हणजेच ही खते ह्युमसने चिलेटेड होतात.
ही भटटीतील खते जेंव्हा आपण जमिनीतून देता त्यानंतर त्या स्फुरदला अथवा पालाशला अथवा सूक्ष्म अन्न घटकांना ह्युमसचे आवरण असल्यामुळे ते जमिनीमध्ये मोठया प्रमाणात असलेल्या क्षारांपासून संरक्षण मिळते. यामुळे आपण दिलेली खते ही पिकांना पूर्णपणे उपलब्ध होतात व अर्थातच आपले उत्पादनवाढ आपणास निश्‍चितच मिळते.

खतांची भट्टी लावण्याची पध्दत
जेवढी रासायनिक खते भट्टीसाठी वापरायचे आहे त्याच्या कमीत कमी दुप्पट वृंदावन एन.पी.के. बूस्टर खत आपणाकडे उपलब्ध असणे गरजेचे आहे. (एक पोते रासायनिक खतासोबत दोन पोती वृंदावन एन.पी.के. बूस्टर)
सर्वप्रथम आपणाकडे असलेले वृंदावन एन.पी.के. बूस्टर खतापैकी निम्मे खत स्वच्छ जमिनीवर सुमारे 1 फूट उंचीने पसरून घ्या.
त्यावर ज्याची भट्टी लावायची आहे ती रासायनिक खते पसरून घ्या. नंतर राहिलेले निम्मे वृंदावन एन.पी.के. बूस्टर खत त्यावर परत पसरून घ्या.
आता ही सगळी खते नीट मिसळून एकजीव करून घ्या. यावर थोडे पाणी शिंपडून घ्या. पाणी शिंपडताना त्याचा चिखल होणार नाही याची काळजी घ्या.
आता ही भट्टी प्लास्टीक कागदाने नीट झाकून घ्या. ही भट्टी सुमारे 10 दिवस अशीच झाकून ठेवा.
10 दिवसांनी तुम्ही ही भट्टीतील खते पिकांसाठी वापरू शकता.

खतांची भट्टी लावताना घेण्याची काळजी
रासायनिक खतांची व सूक्ष्म अन्न घटकांची भट्टी एकत्र लावू नये. भट्टी लावून पूर्ण झाल्यानंतर ही खते एकत्रितपणे वापरता येवू शकतात.
युरीया, अमोनियम सल्फेट अथवा मॅगनेशियम सल्फेट ही खते भट्टी लावून देण्याची गरज नाही. यांची भट्टी लावल्यास पाणी सुटून चिखल होवू शकतो.

भट्टी लावून देण्याची खते
सिंगल, सुपर फॉस्फेट डि.ए.पी.एम.ओ.पी. 10:26:26 सारखी मिश्रखते.
वेगळी भट्टी लावून देण्याची सूक्ष्म अन्न द्रव्ये : फेरस, सल्फेट, झिंक सल्फेट, बोरॉन.

वृंदावन न्यूट्रिबूस्टर




पिकाच्या वाढीमध्ये सूक्ष्म अन्नद्रव्यांचे महत्व
पिकाच्या वाढीसाठी नत्र, स्फुरद आणि पालाश (NPK) हे तीन अन्न घटकांबरोबरच सूक्ष्म अन्नद्रव्यांची पण तितकीच गरज आहे. आपल्या जमिनींमध्ये विशेषतः झिंक, फेरस आणि बोरॉन या तीन घटकांची कमतरता आढळते. त्यामुळे आपल्याला अपेक्षित उत्पन्न मिळत नाही.

सूक्ष्म अन्नद्रव्यांची उपलब्धता
ज्याप्रमाणे फॉस्फेट आणि पोटॅशच्या पिकांना उपलब्धता होण्यासाठी जमिनीत सेंद्रिय कर्ब अथवा सूक्ष्म जीवाणूंची गरज आहे, त्याच प्रमाणे सूक्ष्म अन्नद्रव्ये उपलब्ध होण्यासाठी सुध्दा जमिनीत सेंद्रिय कर्ब अथवा सूक्ष्म जीवाणूंची नितांत आवश्‍यकता आहे. जमिनीत सेंद्रिय कर्ब कमी असल्यामुळे आपण वापरत असलेली सूक्ष्म अन्नद्रव्ये पिकाला फारशी उपलब्ध होत नाहीत आणि आपला उत्पादन वाढीचा प्रश्‍न तसाच राहतो. सूक्ष्म अन्नद्रव्ये उपलब्ध होण्यासाठी वृंदावन एन.पी.के. बूस्टर बरोबर त्याची भट्टी लावून दिली तरच ती पिकांना  उपलब्ध होतात.

सूक्ष्म अन्नद्रव्ये वापरण्याची चुकीची पध्दत
रासायनिक खते देताना आपल्याकडे सर्व रासायनिक खते आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये एकत्र मिसळून देण्याची पध्दत आहे. रासायनिक खतातील फॉस्फेट आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये जर एकत्र मिसळून दिली तर जमिनीत गेल्यावर रासायनिक प्रक्रिया होते आणि दोन्ही घटक पिकाला कधीच उपलब्ध होत नाहीत. यासाठी फॉस्फेट आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये एकत्र मिसळून कधीच दयायची नसतात.

वृंदावन न्यूट्रिबूस्टर खत
  • वृंदावन न्यूट्रिबूस्टर हे खत सूक्ष्म अन्नद्रव्ये आणि वृंदावन एन.पी.के. बूस्टर या सेंद्रिय खताची भटटी लावून तयार केलेले सेंद्रिय खत आहे.
  • झिंक, फेरस आणि बोरॉन हे महत्वाचे आणि आवश्‍यक घटक यात योग्य प्रमाणात आहेत.
  • या शिवाय झिंक बॅक्टेरियाने हे खत परिपूर्ण आहे.
  • हे खत रासायनिक फॉस्फेट खतासोबत वापरता येवू शकते.
  • वृंदावन न्यूट्रिबूस्टर हे 25 किलोच्या बॅग मध्ये उपलब्ध आहे.
  • एकरी दोन पोती वृंदावन न्यूट्रिबूस्टर वापरल्यास कोणत्याही प्रकारच्या अन्य सूक्ष्म अन्नद्रव्ये वापरण्याची गरज नाही.

वृंदावन भट्टी स्पेशल




रासायनिक खतांची सेंद्रिय खतांसोबत भट्टी लावून खतांचा वापर केल्यावर उत्पादन वाढते हे जरी खरेे असले तरी भट्टी लावणे या मध्ये अनेक समस्या असतात. लेबर मिळत नाहीत, उत्तम प्रतिचे सेंद्रिय खत उपलब्ध होत नाही, वेगवेगळया खतांची वेगवेगळी भट्टी लावणे अवघड जाते, भट्टी साठी दोन आठवडयाचा कालवधी देणे हे शक्य नसल्यामुळे अनेक शेतकरी आमच्या कडे सर्व आवश्‍यक घटक पुरविणारे भट्टीतील तयार खताची मागणी करत होते. यासाठी राघवेद्र फर्टिलायझर्स प्रा. लि., कोल्हापूर यांनी सर्व घटकांचा समावेश असलेले “वृंदावन भट्टी स्पेशल” हे सेंद्रिय खत विकसित केलेले आहे. हे खत वापरल्या नंतर नत्रयुक्त खते (युरीया अथवा अमोनियम सल्फेट) सोडून इतर कोणतेही रासायनिक खत अथवा सूक्ष्म अन्न द्रव्ये अथवा शेणखत वापरण्याची गरज नाही.

वृंदावन भट्टी स्पेशल
  • रासायनिक खतांना विषमुक्त, अधिक परिणाम कारक आणि स्वस्त पर्याय.
  • वेगवेगळया घटकांची वेगवेगळी भटटी लावून विकसित केलेले सेंद्रिय खत.
  • हे खत वापरल्या नंतर नत्रयुक्त खते सोडून इतर कोणतेही रासायनिक खत वापरण्याची गरज नाही.
  • कोणतीही जैविक खते अथवा ह्युमिक ॲसिड सारखी टॉनिक वापरण्याची गरज नाही.
  • हे खत वापरल्या नंतर शेणखत किंवा इतर कोणतेही सेंद्रिय खते वापरण्याची गरज नाही.
  • हे खत पावडर स्वरूपातच उपलब्ध आहे जमिनीत मिसळत नसलेल्या दाणेदार स्वरूपात नाही.
  • रासायनिक खत वापरायचेच असल्यास या खतासोबत भटटी लावून वापरता येवू शकते.

वृंदावन भटटी स्पेशल खतातील विविध घटक
  • सेंद्रियकर्ब सुमारे 15 टक्के : जमिनीसाठी सर्वात महत्वाचा घटक.
  • फॉस्फेट सुमारे 5 टक्के : उच्च ग्रेडचे रॉक फॉस्फेटची सेंद्रिय खतासोबत भटटी लावून.
  • पोटॅश सुमारे 5 टक्के : हा पोटॅश उपलब्ध स्वरूपातील असून विषमुक्त अथवा क्लोराईड मुक्त आहे.
  • सूक्ष्म अन्नद्रव्ये : झिंक, फेरस आणि बोरॉन हे अत्यावश्‍यक घटक वेगळी भटटी लावून योग्य प्रमाणात उपलब्ध.
  • पोटॅशियम ह्युमेट : पिकाने सर्व घटकांची उचल करण्यासाठी आवश्‍यक असणारा हा घटक मुबलक प्रमाणात उपलब्ध.
  • जैविकखते : जमिनीला आवश्‍यक असलेली वॅम, पी.एस.बी., के.एम.बी., झिंक बॅक्टेरिया यासारख्या जैविक खतांनी परिपूर्ण असणारे खत.
अधिक माहितीसाठी संपर्क साधा
8805117266, 9112291744, 9011028473
Back to content